29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयनंदीग्राममधून निवडणूक लढवणे ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक

नंदीग्राममधून निवडणूक लढवणे ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये झालेल्या भाजपाच्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर खोचक टीका केली आहे. ममता बॅनर्जींना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चात्ताप होतो आहे. तृणमूल काँग्रेसमधले लोकं सांगतात की ममता बॅनर्जींनी रागात नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी ही सर्वात मोठी चूक केली आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. खुद्द ममता बॅनर्जींनी नंदीग्रामची निवड केल्यामुळे या मतदारसंघात बिग फाईट पाहायला मिळत आहे.

नंदीग्रामचा कौल कुणाला मिळणार?
ममता बॅनर्जी या दरवेळी कोलकातामधील भोवानीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यंदा मात्र त्यांनी हट्टाने नंदीग्राम मतदारसंघाची निवड केली. तृणमूलमधील त्यांचेच एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनाच भाजपाने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राममधून उमेदवारी दिली आहे. नंदीग्राममध्ये अधिकारी समाजाचे प्राबल्य असल्यामुळे सुवेंदू अधिकारी यांना त्याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, तरीदेखील ममता बॅनर्जींनी या मतदारसंघाची निवड केली.

शरद पवारांना मिळाला डिस्चार्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या