23.5 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home राष्ट्रीय ममता बॅनर्जींच्या मंत्र्याचा राजीनामा

ममता बॅनर्जींच्या मंत्र्याचा राजीनामा

पक्षही सोडणार ? : विधानसभा निवडणुकांआधी धक्का

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे, मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर नाराज असलेले मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी आज राजीनामा दिला आहे. अधिकारी तृणमूल काँग्रेसलाही सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चा असून हा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

पश्चिम बंगालच्या शुभेंदू अधिकारी महत्त्वाचे नेते मानले जातात. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पक्षात ममता बॅनर्जी यांचे स्थान मिळविण्याचा प्रयत्न होता असे बोलले जात आहे. ममता बॅनर्जी यांनीही त्यांना परिवहन मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा होत होती. अखेर त्याची परिणिती त्यांच्या राजीनाम्यात झाली. आता ते पक्षही सोडून भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आजच तृणमूल काँग्रेस चे आमदार मिहिर गोस्वामी यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या