30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयप्रचारबंदीविरोधात ममता बॅनर्जींचे धरणे

प्रचारबंदीविरोधात ममता बॅनर्जींचे धरणे

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांसाठीचा प्रचार आणि भाजपा वि. ममता बॅनर्जी हा कलगीतुरा चांगलाच रंगू लागला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत असताना अनेकदा पातळी सोडून आरोप केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने सोमवार १२ एप्रिल २०२१ संध्याकाळी ८ ते मंगळवार १३ एप्रिल २०२१ संध्याकाळी ८ वाजेपर्यंत अशी २४ तासांची प्रचारबंदी घातली. प्रचारादरम्यान जनतेच्या भावना भडकावणारी विधाने केल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर ही प्रचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी या प्रचारबंदीच्या काळात धरणे आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान कोणतेही विधान किंवा आरोप न करता ममतादीदींनी शांतपणे चित्र काढणे पसंत केले़

निवडणूक आयोगाने आपल्यावर घातलेली प्रचारबंदी पूर्णपणे घटनाविरोधी असल्याची भूमिका घेत त्याचा निषेध करण्यासाठी ममता बॅनर्जींनी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मायो रोड परिसरातील गांधी मुर्ती येथे धरणे आंदोलनाला बसल्या. सकाळी ११.३० वाजल्यापासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. या कालावधीमध्ये ममता बॅनर्जी यांनी कोणतीही राजकीय कृती न करता हातात कॅनव्हास घेऊन पेटिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

निवडणूक आयोगाच्या २ नोटिसा
ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने ७ आणि ८ एप्रिल अशा दोन नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, त्यावर ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर आयोगाने प्रचारबंदीची कारवाई केली. ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभांमध्ये केलेली वक्तव्य लोकांना उद्युक्त करणारी होती़ ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला बाधा येत आहे, असे आयोगाने पाठवलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे़

लोकशाहीसाठी काळा दिवस
ममता बॅनर्जी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी दिली आहे. आज भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. ते आम्हाला पराभूत करू शकत नाहीत, म्हणून त्यांनी आमच्यावर बंदी घातली आहे, असे ओब्रायन म्हणाले आहेत.

गंगा मातेच्या कृपेने कोरोना होणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या