22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयममतांनी गड राखला, मात्र, स्वत: पराभूत

ममतांनी गड राखला, मात्र, स्वत: पराभूत

तामिळनाडूत द्रमुक, आसाम, केरळात भाजप, डाव्यांनी गड राखले, पुद्दुचेरीत एनडीएची बाजी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल कॉंग्रेस अशी चुरशीची लढत होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सलग तिस-यांदा एकहाती सत्ता मिळवत विजयाची हॅट्ट्रिक केली. मात्र, नंदिग्राम मतदारसंघातून त्या स्वत: पराभूत झाल्याने गड आला, पण सिंह गेला, अशी स्थिती झाली. त्यांचा सुभेंदू अधिकारी यांनी पराभव केला. दुसरीकडे तामिळनाडूत अण्णाद्रमुक, भाजपला धक्का देत द्रमुक-कॉंग्रेस आघाडीने एकहाती सत्ता मिळविली, तर केरळ आणि आसाममध्ये अनुक्रमे डाव्या पक्षांच्या आघाडीने आणि भाजपने आपले गड राखण्यात यश मिळविले, तर पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात अपेक्षेप्रमाणे भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारल्याने या माध्यमातून भाजपने दक्षिण भारतात चंचुप्रवेश करण्यात यश मिळविले.

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने भाजपाचे आव्हान परतवून लावत दणदणीत मुसंडी मारली आहे. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपने कडवे आव्हान उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी भाजपला जोरदार धक्का देत राज्याची सत्ता राखतानाच विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. म्हणजेच सलग तिस-यांदा सत्तेत येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे मागच्या तुलनेत जास्त जागा जिंकून त्यांनी विजय मिळविला आहे. २०१६ च्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसला २११ जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत २१६ जागांवर विजय मिळविला. परंतु त्यांना नंदिग्रामधून सुभेंदू अधिकारी यांनी पराभूत केले. त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसची अवस्था गड आला पण सिंह गेला, अशी झाली आहे. त्यांचा निसटता पराभव झाला असून, त्यांनी नंदिग्राममध्ये फेरमतमोजणीची मागणी केली आहे.

दरम्यान, या निवडणुकीत कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांना सपाटून मार खावा लागला. एकेकाळी दोन्ही पक्षांचा गड मानला जात असताना या निवडणुकीत या दोन्ही पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. तामिळनाडूतही सत्ता परिवर्तन झाले आहे. द्रमुक -कॉंग्रेस आघाडीने सत्ताधारी अण्णाद्रमुक-भाजप आघाडीला धूळ चारत एकहाती सत्ता मिळाली आहे. राज्यात सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात लढत बघायला मिळाली. सुरूवातीला दोन्ही आघाड्यांमध्ये अटीतटीची लढत सुरू झाली. मात्र, नंतर द्रमुकने जोरदार मुसंडी मारली. तामिळनाडूतील जनतेने द्रमुकच्या पदरात मते टाकत स्पष्ट बहुमताचा कौल दिला. द्रमुक १३१ जागांवर विजय मिळविला आहे, तर सत्ताधारी अण्णाद्रमुकला ६९ जागांवरच समाधान मानावे लागले.

केरळमध्ये राजकीय इतिहासाला कलाटणी मिळाली आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमत दिले आहे. केरळात दर पाच वर्षांनी सत्ता परिवर्तन होते. १९८० पासून ही सत्ता परिवर्तनाची परंपरा आहे. मात्र, ४० वर्षांनी विजयन यांनी ही परंपरा खंडित झाली आहे. कारण विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफने सलग दुस-यांदा विजय मिळविला आहे. डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील एलडीएफने १०० जागांवर विजय मिळविला आहे, तर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. यूडीएफ ४० जागांवर विजय मिळविता आला. विशेष म्हणजे एलडीएफच्या मागच्या तुलनेत जागा वाढल्या आहेत. कारण मागच्या वेळी त्यांना ९१ जागा मिळाल्या होत्या.

आसाममध्ये भाजपने दणदणीत घरवापसी केली आहे. काँग्रेस आणि भाजपात चुरस होती. मात्र, भाजपाने सुरवातीपासूनच आघाडी घेतली. भाजपाने बहुमताचा आकडा पार करत १२६ जागांवर विजय मिळवित राज्यात पुन्हा सत्ता राखली आहे, तर काँग्रेसला ३३ जागांवरच समाधान मानावे लागले. राज्यात भाजपने १० पक्षांच्या महाआघाडीला उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे आसाममध्ये सलग दुस-यांदा बिगर कॉंग्रेसचे सरकार सत्तेत आले आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात ३० जागांसाठी निवडणूक पार पडली. येथे प्रथमच भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली असून, १५ जागांवर विजय मिळवित दक्षिण भारतात आणखी एक राज्य काबीज केले आहे. कॉंग्रेस आणि द्रमुकने मिळून एकूण १० जागांवर विजय मिळविला आहे. तसेच इतरांनी ५ जागा जिंकल्या आहेत. मात्र, येथे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचाच सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.

कर्नाटकात भाजपचा दोन जागांवर विजय
कर्नाटकमध्ये झालेल्या तीन मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला. तर कॉंग्रेसने एक जागा मिळवली. बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार मंगला सुरेश अंगडी या अवघ्या दोन हजार ९०३ मतांनी विजयी झाल्या. माजी रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक लढवली गेली. तेथे सतीश जरकीहोळी यांनी चांगली लढत दिली.

बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथे भाजपाचे शरणु सलगर विजयी झाले. तर रायचूर जिल्ह्यात मस्की विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे बसवगोंडा तुरविहाळ विजयी झाले. येथे भाजपाचे आमदार नारायण राव यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.

फडणवीस यांना चिडवणा-यांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या