25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयममतांनी खासदार महुआ मोईत्रांना झापले

ममतांनी खासदार महुआ मोईत्रांना झापले

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोदी सरकारवर टीका करताना वारंवार पाहिले असेल, पण आता त्यांनी चक्क आपल्याच खासदाराला धारेवर धरले आहे. तृणमूल काँग्रेसमधील आक्रमक खासदार महुआ मोईत्रा यांना ममता बॅनर्जी यांनी चांगलेच सुनावले आहे.

तुमच्या मतदारसंघातच लक्ष द्या, पक्ष संघटनेत लुडबुड करू नका असा सल्ला बॅनर्जींनी मोईत्रा यांना दिला. मोईत्रा कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. कोलकातामधील बूथ श्रेणीतील कार्यकर्त्यांशी बॅनर्जींनी संवाद साधताना मोईत्रा यांना हा सल्ला दिला. करीमपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व कामांकडे मुर्शिदाबादमधील खासदार अबू ताहिर यांना लक्ष घालू द्या, असे बॅनर्जींनी सांगितले आहे.

२०१६ मध्ये मोईत्रा या भागातून आमदार झाल्या होत्या. त्यामुळे या भागाकडे त्यांचा ओढा आहे. तसेच या भागातील कामकाजामध्ये त्या लक्ष घालत होत्या. त्यामुळे बॅनर्जींनी त्यांना समज दिली. मोईत्रा खासदार झाल्यानंतर येथील पोटनिवडणुकीत विमलेंद्रु रॉय जिंकले होते. तसेच अबू ताहिर यांना प्रभारी करण्यात आले होते. ही बाब लक्षात आणून देत हा भाग मोईत्रा यांच्या अधिकार क्षेत्राखाली येत नाही. अबू ताहिर हेच या भागाचे प्रभारी आहेत. त्यामुळे मोईत्रा यांनी इथं लक्ष घालू नये असे बॅनर्जींनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी बॅनर्जी यांच्याकडे मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या