26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयममता दीदीही म्हणतील जय श्रीराम - अमित शाहंचा विश्वास

ममता दीदीही म्हणतील जय श्रीराम – अमित शाहंचा विश्वास

एकमत ऑनलाईन

कोलकाता : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आज पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या रणांगणात उतरले. यावेळी बंगालमधील निवडणूक ऐतिहासिक होईल. ममता बॅनर्जींना गुंडं लोक निवडणूक जिंकूण देतात. त्यांच्या दंगा प्रमुखांसोबत भाजपचे ब्लॉक प्रमुख लढतील आणि जिंकतीलही, अशा शब्दात शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते कूचबिहारमध्ये रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल. यावेळी, भाजपचे सरकार आल्यास एका आठवड्याच्या आत बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अमित शाह यांनी केली. ममता आणि त्यांचा भाचा मे महिन्यानंतर बंगालमध्ये केंद्राच्या योजना लागू करण्यापासून रोखू शकणार नाहीत. एवढेच नाही, तर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करणाºयांना जेलमध्ये टाकले जाईल, असेही शाह म्हणाले.

 

पुण्यातील वकिलाने ‘ईडी’ला बजावली नोटीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या