19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeराष्ट्रीयकर्नाटकात सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती

कर्नाटकात सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती

एकमत ऑनलाईन

बेंगळूरू : कोरोना विषाणूचा धोका पाहता खबरदारी म्हणून कर्नाटकमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली आहे. वर्षाअखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्यानंतर केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. केंद्र सरकारनं प्रत्येक राज्याला खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मंगळवारी देशभरात मॉक ड्रील करण्यात येणार आहे.

कर्नाटकच्या आरोग्य मंर्त्यांनी सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आल्याची माहिती दिली. खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाबरुन जाऊ नका, कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असे कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. कर्नाटकमध्ये सिनेमागृह, शाळा आणि कॉलेजमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. त्याशिवाय नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी अनेकजण पब, हॉटेल, बार आणि पर्यटनस्थळावर गर्दी करतात. कर्नाटक सरकारने पब, हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये मास्क अनिवार्य केला आहे. तसेच राज्यभरात नवीन वर्षाचं स्वागत मध्यरात्री एक वाजेपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंगळवारी देशभरात मॉक ड्रील
२७ डिसेंबर रोजी देशभरातील सर्व आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी मॉक ड्रील आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर टेस्टिंग क्षमता वाढवणे आणि आरटी-पीसीआर, आरएटी किट्सची उपलब्धता, टेस्ट उपकरणांची उपलब्धता याबाबत देखील काळजी घेतली जाईल. आरोग्य संसाधनांची उपलब्धता, अत्यावश्यक औषधांची उपलब्धता, व्हेंटिलेटर, बीआयपीएपी, एसपीओ २ प्रणाली, पीपीई किट, एन-९५ मास्क इत्यादींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्रानं राज्यांना दिल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या