22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयगर्भवती हत्तीणीचा मृत्यूप्रकरणी मनेका गांधी संतापल्या

गर्भवती हत्तीणीचा मृत्यूप्रकरणी मनेका गांधी संतापल्या

- राहुल गांधींवर साधला निशाणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला काही निर्दयी लोकांनी फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची अमानुष घटना उघडकीस आली आहे. हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढर्णा­या पिलासह तिचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी आता भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मेनका गांधींनी केरळमधील वायनाडमधून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले. वन विभागाच्या सचिवांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण खात्याच्या मंर्त्यांना थोडीजरी समज असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे मेनका गांधी म्हणाल्या. वृ्त्तसंस्था एएनआयशी पुढे बोलताना, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्याच भागातील आहेत, त्यांनी अद्याप कारवाई का केली नाही, असा प्रश्नही मनेका गांधी यांनी विचारला.

Read More  हत्तीणीला दिले फटाक्याने भरलेले अननस; तडफडून मृत्यू

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या