22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअनेक देश तिसऱ्या बुस्टर डोसच्या विचारात

अनेक देश तिसऱ्या बुस्टर डोसच्या विचारात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढविले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कोरोना झालेल्यांना एकच डोस पुरेसा असेल, अशीही माहिती समोर आली होती. मात्र, याबाबत सरकारने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. जगातील अनेक देशांमध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले असतानाही ते लसीकरणाबाबत वेगळा विचार करताना दिसून येत असून, वाढत्या कोरोना म्यूटेशनच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये तिसरा बुस्टर डोस देण्यावरून सहमती दर्शविल्या जात आहे.

भारतामध्ये सापडलेल्या डेल्टा व्हेरींयंटमुळे सर्व जगामध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे अनेक देश त्यांच्या नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी तिसरा डोस देण्याचा विचार करत आहेत. कारण, उपलब्ध लसी या अल्फा आणि बिटा स्ट्रेनवर ९० टक्के प्रभावी होत्या. मात्र, सध्या या लसी डेल्टा व्हेरीयंटपासून कमी संरक्षण देत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. मात्र, असे अधिकृतपणे अजून कोणीही सांगितलेले नाही.

इंग्लंडमध्ये क्लिनिकल ट्रायल
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीचा तिसरा डोस गरजेचा आहे का? हे तपासण्यासाठी सध्या इंग्लंडमध्ये क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.

फायझर आणि मॉडर्नाची घोषणा
ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत, त्यांना कदाचित बुस्टर डोस घेण्याची गरज भासू शकते. त्यानंतर वर्षाला या लसीचा डोस घ्यावा लागेल, असे फायझर आणि मॉडर्ना या दोन्ही कंपन्यांनी घोषित केले आहे.

१२ महिन्यांनी तिसरा डोस द्यावा लागणार
सध्याची परिस्थिती बघता, तिस-या डोसची गरज आहे. कुठे सहा महिन्यांनी तर कुठे १२ महिन्यांनी तिसरा बुस्टर डोस घ्यावा लागेल. त्यानंतर या लसीची वार्षिक गरज पडेल. मात्र, त्यापूर्वी या सर्व गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये कोरोना व्हेंरीयंटची भूमिका देखील महत्वाची असेल, असे फायझरचे सीईओ अल्बर्ट बौर्ला यांनी सांगितले.

बुस्टर डोसची गरज पडू शकते : आयसीएमआर
जर कंपन्या लसीच्या दोन डोसनंतर तिसरा डोस देण्याचा विचार करत असतील, तर ते रोगप्रतिकारशक्तीच्या डेटावर अवलंबून असावे, असे आयसीएमआर नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिटयूटचे संचालक समीरन पांडा यांनी सांगितले. म्हणजेच दोन डोस घेतल्यानंतर शरीरातील अँटीबॉडीजची स्थिती काय आहे आणि काही दिवसानंतर ही पातळी जर कमी झाली तर त्या व्यक्तीला तिस-या बुस्टर डोसची गरज पडू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

बुस्टर डोस अँटीबॉडीज टिकविण्यासाठी
कंपन्या बुस्टर डोसबाबत बोलत आहेत. मात्र, हे बुस्टर डोस काय करतात? असाही सवाल त्यांनी विचारला. बूस्टर डोस हा अँटीबॉडीज टिकविण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी असू शकतो. मात्र, सहा ते नऊ महिन्यानंतर अँटीबॉडीज कमी झाल्या की नाही ते समजते, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या