डेहराडून : एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या सावत्र आईसोबत पळून जाऊन लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याची सावत्र आई त्याच्या वयाच्या दुप्पट वयाची आहे. त्यानंतर ५५ वर्षीय वडिलांनी पोलिस ठाणे गाठून आपल्या मुलाविरोधात तक्रार केली आहे. उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील बाजपूर येथे ही घटना घडली आहे.
एका ५५ वर्षीय व्यक्तीने पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर दुसरे लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले होती. लग्न झाल्यानंतर या दोन्ही मुलांनी घर सोडले. त्यानंतर वडील आपली दुसरी पत्नी आणि एका लहान मुलीसोबत बाजपूर येथे राहत होते. पण, गेल्या एक वर्षापासून लहान मुलगा घरी येत होता. त्याची सर्वांसोबत जवळीक वाढली होती. गेल्या ११ मे रोजी पत्नीने माहेरी जाते असे सांगून घर सोडले. पण, ती घरी परतली नाही. त्यानंतर वडिलांना कळले की, आपल्या पत्नीने आपल्याच लहान मुलासोबत लग्न केले असून दोघेही एकत्र राहत आहेत.