नवी दिल्ली : भारतात चीन विरोधात मोठे वातावरण तापले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच कैट ने एक योजना तयार केली असून, गलवान खो-यातील संघर्षात भारताचे २० जवान शहिद झाले होते़ त्याचा बदला म्हणून देशातील सर्वात मोठ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर देशभरातल्या व्यापा-यांनी चीनला धडा शिकविण्याचा निर्धार केला असल्याची माहिती कैटचे अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी दिली आहे.
भारत आणि चीनच्या सीमेवर अजुनही तणाव कायम आहे. भारताचा विश्वासघात करत चीनने गेल्या अनेक महिन्यांपासून सीमेवर कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. गेल्या ४५ वर्षांमध्ये झाल्या नाहीत अशा घटना घडत आहेत. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चिनी सैनिकांनाही आपले प्राण गमवावा लागले.
चीनला ४० हजार कोटींचा फटका बसणार
दिवाळी हा देशातल्या सर्वात मोठा सण असल्याने त्यादरम्यान लोक सर्वात जास्त खरेदी करत सतात. या काळात गेल्या काही वर्षांमध्ये ७० हजार कोटींचा व्यवसाय होतो. त्यात जवळपास ४० हजार कोटींच्या वस्तूंची आयात ही चीनमधून होत असते. यार्षी ही चीनमधून वस्तूच आयात करायच्या नाहीत असा निर्णय या व्यापा-यांनी घेतला आहे. त्यामुळे चीनला ४० हजार कोटींचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
सणाच्या सर्व वस्तू मेड इन इंडिया मिळणार
शोभेच्या वस्तू, पूजेचे सामान, ईलेक्ट्रीक गॅझेट्स, वीजेच्या माळांपासून ते फटाक्यांपर्यंत सगळ्या वस्तू स्वस्त असल्याने चीनमधून आयात केल्या जात होत्या. मात्र आता बदलल्या परिस्थितीत ही आयात न करता भारतातल्याच वस्तूंना प्राधान्य देण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला आहे. अशी माहिती कैटचे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी दिली आहे.
मेड इन इंडिया ला प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिल्याने तसेच, चीन-भारत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता मेड इन इंडियाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत सरकारी संस्थांनीही दिले आहेत.
नितीश कुमारच मुख्यमंत्री; अमित शाह यांची जाहीर घोषणा