भोपाळ : भिंड जिल्ह्यातील गोहड भागात एका कुटुंबाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गळफास घेतल्यानंतर पती, पत्नी आणि एका मुलाचा मृत्यू झाला, तर मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.
गोहडपासून तीन किमी अंतरावर असलेल्या काठमा गावात ही घटना घडली. कुटुंबाने एवढे मोठे पाऊल का उचलले, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. धर्मेंद्र गुर्जर यांनी पत्नी आणि दोन निष्पाप मुलांसह गळफास लावला.