24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयब्राह्मण समाजासाठी मायावतींचा मास्टर प्लॅन

ब्राह्मण समाजासाठी मायावतींचा मास्टर प्लॅन

एकमत ऑनलाईन

उत्तर प्रदेश : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिशन २०२२ साठी ब्राह्मणांना सोबत जोडण्यासाठी मायावती रणनीती आखताना दिसत आहेत. बसपा ब्राह्मणांचे मंडलीय संमेलन आयोजित करणार आहे.

याची जबाबदारी राष्ट्रीय महासचिव सतीश चंद्र मिश्रा यांना देण्यात आली आहे. याची सुरुवात २३ जुलैपासून होणार आहे. सतीश चंद्र मिश्रा अयोध्येत रामाचे दर्शन घेतील. त्यानंतर पहिल्या टप्प्यात २३ जुलै ते २९ जुलै असे सहा जिल्ह्यात संमेलन घेतले जाईल. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारी करताना दिसत आहेत.

बसपा प्रमुख मायावतीही सक्रिय झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष बांधणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी बूथ गठनची जबाबदारी जिल्हाध्यक्षांकडे होती, पण ती आता मुख्य सेक्टर प्रभारिंकडे असणार आहे. मुख्य सेक्टर अधिकारी स्वत: आपल्या प्रभागात जाऊन बूथ गठनचे काम करतील.

नांदेड जिल्ह्यात आठ कोरोना बाधितांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या