नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतक-यांमधील मंगळवार दि़ १ डिसेंबर रोजीची बैठक निष्फळ ठरली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवन येथे पंजाबच्या शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ आणि केंद्र सरकार यांच्यात जवळपास तीन तास चर्चा झाली. मात्र, या बैठकीत काहीच निष्पन्न न झाल्याने शेतक-यांनी हे आंदोलन जारी ठेवण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून शेतक-यांना गुरुवारी (3 डिसेंबर) पुन्हा बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. पुढील बैठक गुरुवारी दुपारी बारा वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बैठकीनंतर विज्ञान भवनमधून बाहेर पडल्यानंतर शेतक-यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आम्हाला एक छोटी समिती स्थापन करण्याचा सल्ला दिला. सरकार त्या छोट्या समितीसोबत चर्चा करेन, असे मंत्र्याकडून सांगण्यात आले. पण आम्हाला सरकारचा प्रस्ताव मंजूर नाही. आता सरकारसोबत पुढची बातचित गुरुवारी होईल, असे बैठकीत उपस्थित असलेल्या एका शेतक-याने सांगितले.
दरम्यान, शेतक-यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी देखील प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारची शेतक-यांसोबत मंगळवारी तिस-यांदा चर्चा झाली. आता पुढील चर्चा गुरुवारी होईल. गुरुवारी शेतकरी आपला मुद्दा मांडतील. त्यावर चर्चा होईल, असे तोमर यांनी सांगितले.
शेतक-यांची एक समिती स्थापन व्हावी, असे आमचे मत आहे. मात्र, शेतक-यांचे म्हणणे आहे की, सर्वांशी चर्चा करावी. आम्ही शेतकरी बांधवांना विनंती करतो की, त्यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि सरकारशी बातचित करावी. शेवटी शेतक-यांनी निर्णय घ्यावा, अशी भूमिका कृषी मंत्र्यांनी यावेळी मांडल़
नवजात मुलीसह आईचे घोङ्यावर बसून आगमन; फुलांच्या पायघङ्या घालून स्वागत