26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयमेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी दावा केला की काश्मिरी पंडित सुनील कुमार भट यांच्या कुटुंबाला भेटण्यापासून रोखण्यासाठी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. भट यांची नुकतीच शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

मुफ्ती यांनी गुपकर भागातील त्यांच्या निवासस्थानाच्या बंद दरवाज्याबाहेर पार्क केलेल्या सीआरपीएफच्या वाहनाचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. माजी मुख्यमंत्री म्हणाल्या की केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. काश्मिरी पंडितांच्या दुरवस्थेकडे केंद्र सरकार लक्ष घालू इच्छित नाही. चुकीच्या धोरणांमुळेच त्या लोकांच्या दुर्दैवी टार्गेट किंिलगच्या घटना घडल्या आहेत. यासाठी सरकार आपल्याला सर्वांसमोर काश्मिरी पंडितांचे शत्रू म्हणून दाखवत आहे. म्हणूनच आज मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. छोटीगाम येथील भट कुटुंबाला भेटण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला, असे मुफ्ती यांनी संदेशात म्हटले आहे. प्रशासनाचा दावा आहे की आम्हाला कुलूपबंद करणे हे आमच्या सुरक्षेसाठी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या