तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक ऐलात शहरात उभारण्यात येणार आहे. ज्यू धर्मियांनाही या दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य केले होते.
हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू तर, ३०० हून अधिक जखमी झाले होते. ऐलातचे महापौर मीर इत्जाक यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे ‘सितार’ या संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. हे स्मारक भारत-इस्रायल फ्रेंडशिप स्क्वेअर अथवा महात्मा गांधी स्क्वेअरवरही बनवले जाऊ शकते. शहरात चौक, स्मारक बनवण्याच्या समितीत महापौर स्वत: असल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.
दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे नाहीच