36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयलोकसभा-राज्यसभा टीव्हीचे विलीनीकरण

लोकसभा-राज्यसभा टीव्हीचे विलीनीकरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज दाखवणाºया लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही दोन्ही वाहिन्यांचे सरकारने विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही वाहिन्यांची एकच वाहिनी केली जाणार असून, त्याचे नाव संसद टीव्ही असे असणार आहे. याच चॅनेलवरून आता दोन्हा सभागृहांच्या कामजाचा प्रक्षेपण केले जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींच्या निर्णयानंतर दोन्ही वाहिन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे प्रक्षेपण लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही वाहिन्यांवरून केले जाते. त्याचबरोबर इतर चर्चा आणि वार्ताकंनही या वाहिन्यांवरून केले जाते. आता दोन्ही वाहिन्यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या संमतीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही वाहिन्यांचे विलीनीकरण करून संसद टीव्ही अशी एकच वाहिनी असणार आहे. सेवा निवृत्त सनदी अधिकारी रवि कपूर यांची संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कपूर यांनी यापूर्वी विविध केंद्रीय मंत्रालयांमध्ये वेगवेगळ्या पदांवर सेवा बजावली आहे.

लोकसभेचे कामकाज दाखवण्यासाठी लोकसभा टीव्ही सुरू करण्यात आली होती. १९८९ मध्ये ही वाहिनी सुरू करण्यात आली होती. काही काळानंतर राष्ट्रपतींचे अभिभाषण, लोकसभेतील प्रश्नोतरांचा तास, शून्यप्रहर यांचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे लोकसभा टीव्ही या वाहिनीच्या धर्तीवर राज्यसभेचे कामकाज दाखवण्यासाठी राज्यसभा टीव्ही सुरू करण्यात आली. २०११मध्ये ही स्वतंत्र वाहिनी सुरू झाली.

दोन वर्षांत १ कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या