27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयकॅप्टन अमरिंदर सिंहसह पीएलसीचे भाजपमध्ये विलिनीकरण

कॅप्टन अमरिंदर सिंहसह पीएलसीचे भाजपमध्ये विलिनीकरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली :पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यासह त्यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन केला आहे. त्यांच्या भाजप प्रेवशवेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि किरेन रिजिजू उपस्थित होते. यावेळी बोलताना तोमर म्हणाले की, पीएलसीचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे पक्ष मजबूत होईल.

ते पुढे म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नेहमीच सर्वात आधी प्राधान्य दिले आहे. भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. अमरिंदर सिंह यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नेते आणि पंजाब विधानसभेचे माजी उपसभापती अजयब सिंग भाटी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तोमर पुढे म्हणाले की, भाजप हा असा पक्ष आहे, ज्यामध्ये नेहमीच अभिमानाने देश प्रथम आणि पक्ष दुसरा असल्याचे सांगितले जाते. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या आयुष्यात हे तत्व नेहमीच अंगीकारले. त्याचाच परिणाम म्हणून आज आम्ही सगळे एकत्र आहोत.

याच दरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. आज त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसवर नाराज होऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि पीएलसीची स्थापना केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या