24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयडिझेलला मिथेनॉल हाच पर्याय - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

डिझेलला मिथेनॉल हाच पर्याय – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

एकमत ऑनलाईन

मुंबई : इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. यामुळे अनेकांचे बजेड कोलमडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा मुकाबला करण्यासाठी देशाला पर्यायी इंधन स्त्रोतांचा वापर करावा लागेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे म्हणणे आहे. तसेच मालवाहतूक जलमार्गांना चालना द्यावी लागेल कारण ते वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे.

मंगळवारी ‘वॉटरवेज कॉन्क्लेव्ह-२०२२’ला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांचे स्वस्त आणि सहज उपलब्ध पर्याय शोधणे आता गरजेचे झाले आहे. डिझेलला मिथेनॉल हा पर्याय असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, ते डिझेलपेक्षाही स्वस्त आहे आणि डिझेल इंजिनला मिथेनॉलवर चालणा-या इंजिनमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञानही उपलब्ध आहे.

मिथेनॉलला चालना द्या
केंद्रीय मंत्री म्हणाले की, आसाममध्ये दररोज १००टन मिथेनॉलचे उत्पादन होते. हे उत्पादन दररोज ५०० टनांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तंत्रज्ञानात बदल करून डिझेल इंजिनचे रूपांतर मिथेनॉल इंजिनमध्ये केले तर त्याचा फायदा आसामला होईल. ते म्हणाले की, मिथेनॉलच्या वापरामुळे इंधनाचा खर्च ५० टक्क्यांनी कमी होईल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या