32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home राष्ट्रीय मेट्रो, बस वाहतुकीचे जाळे वाढणार

मेट्रो, बस वाहतुकीचे जाळे वाढणार

नाशिकमध्ये मेट्रो सुरू होणार, नागपूरच्या दुस-या टप्प्यासाठी ५ हजार ९०० कोटींची तरतूद

एकमत ऑनलाईन

भारतात मेट्रो आणि बस वाहतुकीचे जाळे अधिक घट्ट करण्यात येणार असून, भविष्यात मेट्रो लाइट आणि मेट्रो नॅनो तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. देशातील टू टीयर आणि वन टीयर शहरांच्या आजूबाजूच्या भागांमध्ये या मेट्रोचे जाळे उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे यासंबंधीच्या विशेष निधीत महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूर शहरांचा उल्लेख आहे. त्यामुळे आता नाशिकमध्येही मेट्रो सुरू होणार आहे. त्यासाठी २ हजार ९२ कोटी, तर नागपूरमध्ये दुस-या टप्प्यातील मेट्रोचे काम करण्यासाठी ५ हजार ९००० कोटींची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

भारतामध्ये मेट्रो आणि बस वाहतुकीचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी विशेष तरतूद करत असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. देशातील वेगवेगळ्या भागांमधील शहरांसाठी मेट्रोचे काम करण्याच्या दृष्टीने निधी देण्याबाबत सविस्तर माहिती दिली. यात महाराष्ट्राची उपराजधानी असणा-या नागपूरमध्ये दुस-या टप्प्यातील मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी ५ हजार ९०० कोटी रुपये दिले जाणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच नाशिकमध्येही मेट्रोचे काम होणार असून यासाठी २ हजार ९२ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

दक्षिणेमधील बंगळुरु आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांनाही मेट्रोची सेवा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. बंगळुरूमधील मेट्रोचा विस्तार करण्यासाठी १४ हजार ७८८ रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. या पैशांमधून बंगळुरू मेट्रोचे जाळं ५८.१९ किलोमीटरने वाढवण्यात येणार आहे. याचप्रमाणे चेन्नईमध्येही मेट्रोच्या दुस-या मार्गाचे काम केले जाणार असून हा मार्ग ११८.९ किलोमीटरचा असणार आहे. यासाठी ६३ हजार २४० रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

रेल्वेसाठी विक्रमी १ लाख १० हजार ५५ कोटींची तरतूद
रेल्वेसाठी विक्रमी १,१०,०५५ कोटींची तरतूद करण्यात आली असून या तरतुदीतील १,०७,१०० कोटी रुपये केवळ भांडवली खर्चासाठी वापरले जाणार आहेत. राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० या प्रोजेक्टसह मेट्रो, सिटी बस सेवेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नागपूर-नाशिकसह कोची आणि चेन्नईमध्ये मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.

आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या