23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीय१०० फुट खोल समुद्रात मिलिंद सोमणचा ‘रोमान्स’

१०० फुट खोल समुद्रात मिलिंद सोमणचा ‘रोमान्स’

एकमत ऑनलाईन

अभिनेता मिलिंद सोमण हा नेहमीच त्याच्या हटकेपणासाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. त्याने आपल्या वयापेक्षा अर्ध्या वयाच्या अंकिताशी लग्न केले. त्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आला होता.

काही वर्षांपूर्वी मिलिंद हा गोव्यातील समुद्रकिना-यावरुन नग्नावस्थेत धावला होता. त्यामुळे देखील त्याच्यावर टीका झाली होती. तो भारतातील सर्वाधिक लोकप्रिय फिटनेस फ्रिक आहे.

आता मिलिंद चर्चेत आला आहे त्याचे कारण त्याने समुद्रात शंभर फुट खाली केलेला रोमान्स. हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मिलिंदवर एकीकडे कौतूकाचा वर्षाव होतोय तर दुसरीकडे त्याच्यावर सडकून टीकाही केली जात आहे.

मिलिंद आणि अंकिताच्या अंडर वॉटर रोमान्सचा तो व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. त्या दोघांनी अंडर वॉटर स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला आहे. तो व्हिडिओ शेयर करताना मिलिंदने लिहिले आहे की, जास्तीत जास्त अनुभव घेणे, जास्त फिरणे, आनंद घेणे.

मिलिंदने शंभर फुट पाण्याखाली हार्टचा इमोजी बनवला आहे. त्याला चाहत्यांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. यापूर्वी देखील अंकिता आणि मिलिंदचे अंडर वॉटर फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाले, त्याला नेटक-यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या