26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयअमूल, मदर डेअरीचे दूध २ रुपयांनी महागले

अमूल, मदर डेअरीचे दूध २ रुपयांनी महागले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील दोन अग्रगण्य दूधाचे बँड असलेल्या अमूल दूध आणि मदर डेअरीने दुधाच्या किंमतीत २ रुपये प्रतिलिटरने वाढ केली आहे. ही दरवाढ १७ ऑगस्टपासून होईल असे या कंपन्यांनी अधिकृतरित्या जाहीर केले आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण येणार आहे.

गुजरात सहकारी दूध विपणन फेडरेशन अर्थात अमूल डेअरीने दुधाच्या दरवाढीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, अमूल दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मार्केटिंगविभागाकडून दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद, सौराष्ट्र, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई आणि इतर ठिकाणी अमूलच्या दुधात १७ ऑगस्टपासून अर्थात येत्या बुधवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. दरम्यान, दुसरीकडे मदर डेअरीने देखील दुधाच्या दरात वाढ केली आहे. पीटीआयनं याबाबत माहिती देताना सांगितलं की, मदर डेअरीनं दुधाच्या दरात २ रुपये प्रतिलिटरने वाढ केली असून बुधवारपासून ही दरवाढ लागू होईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या