28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयमंत्र्याचे नितीन गडकरींसमोर लोटांगण

मंत्र्याचे नितीन गडकरींसमोर लोटांगण

एकमत ऑनलाईन

भोपाळ : केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी कालपासून मध्य प्रदेश दौ-यावर आहेत. इथे एका कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान सरकारमधील एका मंत्र्याने व्यासपीठावरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना नमस्कार करत दंडवत घातला. याचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हीडीओमध्ये दिसत आहे की, राज्याच्या मंत्र्याने नितीन गडकरींसमोर स्टेजवरच दंडवत प्रणाम केला. त्यांचा हा अनोखा अंदाज पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही हसू आवरले नाही. ग्वाल्हेरमध्ये ११०० कोटींहून अधिक रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ग्वाल्हेरला पोहोचले होते. सर्व पाहुणे स्टेजवर होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या