नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वादग्रस्त जाहिरातीवर बंदी घातली आहे. समाजात तेढ आणि हिंसाचार निर्माण करणा-या जाहिरातीवर निर्बंध घातले असून संहितेनुसार जाहिरातींची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडियावरील अश्लील आणि वादग्रस्त जाहिरातींना आळा बसावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयानंतर नेटक-यांनी अशा वादग्रस्त जाहिराती सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.