22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीयपावसासाठी आमदारांची चिखलाने आंघोळ

पावसासाठी आमदारांची चिखलाने आंघोळ

एकमत ऑनलाईन

महाराजगंज : उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये पाऊस पडत नसल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी भाजप आमदार जय मंगल कन्नोजिया आणि नगरपालिका अध्यक्ष कृष्ण गोपाल जैस्वाल यांना चिखलाने आंघोळ घातली.

महिलांनी दोन्ही लोकप्रतिनिधींकडे जाऊन चिखलाने आंघोळ घालू देण्याची विनंती केली. ही विनंती लोकप्रतिनिधींनी मान्य केल्यानंतर दोघांनाही चिखलाने आंघोळ घातली.

यावर्षी मान्सून पूर्व उत्तर प्रदेशवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसासाठी एकच गोंधळ उडाला आहे. लखनौ, गोरखपूर, वाराणसीसह पूर्व उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णता आणि आर्द्रतेमुळे लोक हैराण झाले आहेत. सुमारे ३० टक्के तांदळाची रोपे वाळली आहेत. शेतकरी आशेने आभाळाकडे बघत आहेत.

महाराजगंजमध्ये लोकांनी आमदार आणि नगराध्यक्षांना चिखलाने आंघोळ घालण्याचा प्रयत्न केला. परिसरातील प्रतिष्ठित लोकांना चिखलाने स्रान केल्याने इंद्रदेव प्रसन्न होतो. खूप पाऊस पडतो, अशी पूर्वापार श्रद्धा आहे, असे चिखल ओतण्यासाठी आलेल्या महिलांनी सांगितले.

उष्मा, आर्द्रतेने उत्तरप्रदेश त्रस्त
उष्मा आणि आर्द्रतेचा सामना करणा-या उत्तर प्रदेशातील लोकांना आणखी काही काळ मान्सूनच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. लखनौ येथील विभागीय हवामान केंद्राचे संचालक जेपी गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशात मान्सूनच्या पावसासाठी आणखी एक आठवडा लागू शकतो. सोनभद्रमध्ये मान्सूनच्या प्रवेशानंतर वेग कमी झाला. ज्यामुळे मान्सून पूर्व उत्तर प्रदेशच्या दिशेने जाऊ शकला नाही. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेशात पाऊस पडत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या