27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीय७२ तास आमदार-खासदारांना पटना सोडण्यास बंदी

७२ तास आमदार-खासदारांना पटना सोडण्यास बंदी

एकमत ऑनलाईन

पटना : बिहारच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका बाजूला लालू प्रसाद यादवांचे राष्ट्रीय जनता दलाने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात युद्धच छेडलं. तर दुस-या बाजूला भाजपासोबत युती करून सरकार चालवणारे नीतिश कुमार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

यामुळे आता बिहारच्या सत्ताकारणात बदल होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुढचे ७२ तास बिहारच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या आमदारांशी सातत्याने चर्चा करत आहेत. भाजपासोबत युती करून सत्तेवर असतानाही त्यांनी पुढचे ७२ तास आपल्या सर्व नेते, आमदारांना पटनामधून बाहेर पडण्यास मनाई केली आहे.

नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे आता बिहारच्या राजकारण मोठा सत्ताबदल होणार का? नितीश कुमार भाजपापासून वेगळे होत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या विचारात आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण या प्रश्नांची उत्तरे आता ७२ तासांनंतरच मिळणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या