22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयआमदारांना रांचीवरून रायपूरला हलवले

आमदारांना रांचीवरून रायपूरला हलवले

एकमत ऑनलाईन

रांची: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आता झारखंडमधील महागठबंधन सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महागठबंधनच्या सर्व आमदारांना आता रांचीवरून रायपूरला हलवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे स्वत: प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेऊन असून त्यांनी आज दोन बसमधून आमदारांना रायपूरला हलवले. आम्ही प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असून राज्य सरकारला कोणताही धोका नसल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे.

झारखंडच्या महागठबंधन सरकारमध्ये हेमंत सोरेन याचा झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांचा समावेश आहे. आपल्याकडे ५० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे असा दावा महागठबंधनने केला आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या शिफारशीनंतर सर्व आमदार मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी जमले होते. त्यानंतर त्या सर्व आमदारांना एका गेस्ट होऊसवर ठेवण्यात आलं होतं.

भाजप आपलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असून यासाठी त्यांच्याकडून घोडेबाजार करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे. आता सर्व आमदारांना रायपूरला हलवण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या