24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयकाम न करणा-या आमदारांना विश्रांती देणार

काम न करणा-या आमदारांना विश्रांती देणार

एकमत ऑनलाईन

बंगळूर : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ नागरिकांची जमवाजमव करून काम न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ‘विश्रांती’ दिली जाईल, असा कडक इशारा केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी पक्षाचे आमदार आणि नेत्यांना दिला.

शिवकुमार म्हणाले की आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्यासह काही आमदारांनी ३० सप्टेंबरला कर्नाटकात होणा-या भारत जोडो यात्रेला कार्यकर्त्यांना पाठवण्यास नकार दिला आहे. यात्रेदरम्यान पक्षाचे काम करण्यास नकार देणा-या सर्व नेत्यांना २०२३ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली जाणार नाही, असा इशारा शिवकुमार यांनी दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या