22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयवॉशरूममधून बनवला गेला एमएमएस

वॉशरूममधून बनवला गेला एमएमएस

एकमत ऑनलाईन

चंदीगड : चंदीगड विद्यापीठातील व्हीडीओ लीकच्या घटनेनंतर देशात खळबळ माजली असून या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर आता या हॉस्टेलच्या बाथरूमचे काही फोटो समोर आले असून त्याद्वारे नव नवे दावे केले जात आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी विद्यार्थ्यावर वसतिगृहातील विद्यार्थिनींचे अश्­लील व्हीडीओ बनवून ते तिच्या कथित प्रियकराला पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सध्या राहत असलेल्या या वसतिगृहात पूर्वी मुले राहत होती. त्यामुळेच येथे तयार केलेल्या वॉशरूममधील वरच्या भागात छत नाही आहे. तसेच दाराखालील बराच भाग मोकळा आहे. त्यामुळे कुणाही येथून व्हीडीओ अगदी सहज शुट करू शकतो. ज्यावेळी हे वसतिगृह मुलींसाठी सुरू करण्यात आले त्यावेळी मुलींच्या दृष्टीने वॉशरूममध्ये जे आवश्यक बदल करणे गरजेचे होते. ते करण्यात आले नव्हते असा आरोप मुलींनी केला आहे.

वेळीच बदल केले असते तर, असा प्रकार घडला नसता दरम्यान, ज्यावेळी हे वसतिगृह मुलींसाठी सुरू करण्यात आले त्यावेळी जर, सुरक्षेच्या दृष्टीने या बॉशरुममध्ये आवश्यक बदल केले असते तर, अशा प्रकारची लाजीरवाणी घटना घडली नसती असे मत अनेक मुलींनी व्यक्त केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी, तिचा प्रियकर सनी मेहता आणि सनीचा मित्र रंकज वर्मा यांचा सहभाग आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या