24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयतवांग मठातून देण्यात येतेय मॉडर्न शिक्षण

तवांग मठातून देण्यात येतेय मॉडर्न शिक्षण

एकमत ऑनलाईन

तवांग : तवांग येथील पवित्र स्थळ म्हणून ओळखल्या जाणा-या तवांग मॉनेस्ट्री (मठ) येथे बौद्ध शिक्षणाबरोबरच मुलांना मॉडर्न एज्युकेशन देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे भविष्यात या मुलांना मुख्य प्रवाहात येणे सोपे होऊन जाते. तवांग मठाला अरुणाचमधील एक पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाते.

येथील असे कुटुंब ज्यांच्या घरात तीन किंवा त्या पेक्षा जास्त मुले आहेत अशा घरातील दुस-या मुलाला या मठात लामा म्हणून प्रवेश दिला जातो. याबाबत मठातील संगेलेता लामा यांनी सांगितले, लामा प्रशिक्षण घेताना सर्व मुलांना बौद्ध धर्माचा इतिहास, त्याचे महत्त्व, समाजासाठी होणारा उपयोग अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. १९७० पर्यंत केवळ बौद्ध धर्मविषयक शिक्षण दिले जात होते.

कशाचे शिक्षण देण्यात येते?
बोधी किंवा तिब्बत भाषेचा वापर केला जात होता. मात्र त्यानंतर मॉडर्न एज्युकेशनच्या शिक्षणाची हळू हळू सुरवात झाली. आता येथे मुलांना आठवीपर्यंतचे शिक्षण येथे दिले जाते. त्यामध्ये गणित, इंग्रजी, हिंदी, सामाजिक विज्ञान, संस्कृत आदींचा समावेश आहे.

आठवीनंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करता येणार
केवळ बौद्ध धर्माचा अभ्यास ज्यांना करायची इच्छा असते ते आठवीनंतर या मठातच बौद्ध धर्माचे शिक्षण सुरू ठेवतात. तर काही जण इतर विषयातील पुढील शिक्षणासाठी, पीएचडी किंवा संशोधन याकरिता हिमाचल प्रदेश येथील धर्मशाळा किंवा वाराणसी येथील विद्यापीठात प्रवेश घेतात.

१७ व्या शतकात तवांग मठाची स्थापना
या मठाची स्थापना १६८१ मध्ये मेरेक लामा लोद्रे ग्यात्सो यांनी केली होती. त्यावेळचे ५ वे दलाई लामा यांच्या आशीर्वादाने या मठाची उभारणी करण्यात आली होती. त्यावेळी तवांग तिब्बतचे एक भाग होते. येथील धर्म गुरूंना लामा असे म्हणले जाते. अनेक लोकांना बौद्ध धर्माबाबत माहिती नसल्याने लोकांपर्यंत या धर्माची माहिती पोचविण्याच्या अनुषंगाने हा मठ साकारण्यात आला होता.

१५ व्या दलाई लामांबाबत मौन
तवांग परिसरात अनेक मठ आहेत. येथे महिला आणि पुरुष असे दोन्ही लामा बौद्ध धर्माचे पालन करत लोकांपर्यंत या धर्माचा प्रसार करत आहेत. अशाच काही लामांशी भविष्यातील १५ व्या दलाई लामा यांच्याबाबत चर्चा करण्यात आली. १४ व्या दलाई लामा यांच्या नंतर नव्या दलाई लामा यांची निवड कशी होणार? किंवा नवीन दलाई लामा कोण असतील असे विचारल्यास, प्रत्येकाने मौन राहणे योग्य समजले. तसेच अताचे दलाई लामा हे वयाच्या १०३ वर्षांपर्यंत आपला कार्यकाळ सांभाळतील आणि त्यानंतर १५ व्या दलाई लामा यांच्या बाबत विचार केला जाईल. असे विविध मठातील लामा यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या