23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeआंतरराष्ट्रीयमोदी सीमावाद सोडवण्यास सक्षम; पुतिन यांना विश्वास

मोदी सीमावाद सोडवण्यास सक्षम; पुतिन यांना विश्वास

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे दोघेही जबाबदार नेते असून भारत-चीन सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी ते सक्षम आहेत, असा विश्वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर हा प्रश्न सोडवताना अतिरिक्त प्रादेशिक शक्तींची गरज नसल्याचे सांगताना भारत-चीन परस्परातील सीमावाद सोडवतील असेही त्यांनी म्हटले आहे.

होय मला माहिती आहे की भारत आणि चीनमध्ये काही वाद आहेत. पण शेजारी राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचे वाद नेहमी होतच असतात. पण भारताचे पंतप्रधान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष या दोन्ही जागतीक नेत्यांचा दृष्टीकोन मला माहिती आहे. हे दोघेही खूपच जबाबदार लोक असून, एकमेकांना पुरेसा सन्मान देत ते कायमच आपल्यासमोरील प्रश्नावर तोडगा काढतील. पण हे महत्वाचे आहे की, इतर कुठल्याही अतिरिक्त प्रादेशिक शक्तींनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही़ व्हर्च्युअल बैठकीदरम्यान पीटीआयशी बोलताना पुतिन बोलत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कर चीनच्या लष्करासमोर उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी हे भाष्य केले आहे.

भारत-चीनमध्ये डिप्लोमॅटिक चर्चा
भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मे महिन्यापासून या वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत दोन्ही बाजूंचे सैन्य तैनात केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेकदा झालेल्या सैन्यबैठकीतनंतर पँगॉंग लेकच्या उत्तर आणि दक्षिण किना-यावरून हे सैन्य मागे घेण्यात आले होते. त्याचबरोबर हॉटस्प्रिंग, गोग्रा आणि देपसंग येथील काही तणावाच्या भागातून सैन माघारीसाठी डिप्लोमॅटिक चर्चा सुरू आहे.

दिल्ली अनलॉकला हिरवा कंदील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या