24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयरशिया, युक्रेनमध्ये मोदी प्रस्थापित करु शकतात शांतता; मेक्सिकोचा दावा

रशिया, युक्रेनमध्ये मोदी प्रस्थापित करु शकतात शांतता; मेक्सिकोचा दावा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आणि या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने विशेष समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मेक्सिकोने संयुक्त राष्ट्रांसमोर मांडला आहे. विशेष म्हणजे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश असणार आहे. या दोन्ही देशांमध्ये कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मोदीच प्रयत्न करु शकतील असेही मेक्सिकोने युएनमध्ये म्हटले आहे.

खरेतर पंतप्रधान मोदींसह ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस आणि युएनचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांचाही या समितीत समावेश करण्यात यावा असेही मेक्सिकोने म्हटले आहे. न्यूयॉर्क इथे युक्रेनमधील परिस्थितीबाबत आयोजित युएनच्या सिक्युरिटी काऊन्सिलच्या डिबेटमध्ये मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो लुईस एब्रार्ड कॅसिबोन यांनी हा प्रस्ताव मांडला.
दरम्यान, उझबेकिस्तानच्या समरकंद इथे शांघाई सहकार संघटनेची २२वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांची भेट झाली होती. यावेळी ‘आजचे युग हे युद्धाचे नाही’, असे मोदींनी पुतिन यांना सांगितले होते. मोदींच्या या विधानाचे स्वागत अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांसह फ्रान्स आणि ब्रिटनने केले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या