30.8 C
Latur
Friday, March 5, 2021
Home राष्ट्रीय मोदी सरकारकडून ३० लाख कर्मचा-यांना बोनस

मोदी सरकारकडून ३० लाख कर्मचा-यांना बोनस

दिवाळीपुर्वीच धमाका ; केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र संथ झालं आहे. अर्थव्यवस्थेला उभारी यावी यासाठी केंद्रसरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी(२१) केंद्रसरकारने ३० लाख विना-राजपत्रित कर्मचा-यांना बोनसची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तात्काळ बोनस वितरित करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थी कर्मचा-यांची दस-यापासूनच दिवाळी सुरू होणार आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.

जावडेकर म्हणाले की, दस-याच्या अगोदर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर(डीबीटी)द्वारे कर्मचा-यांच्या खात्यात थेट बोनसची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. कॅबिनेटमध्ये बुधवारी २०१९-२० साठी प्रोडक्टिव्ह लिंक्ड बोनस (पीएलबी) आणि नॉन प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचा-यांना एकूण ३ हजार ७३७ कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. ३० लाख विना-राजपत्रित कर्मचा-यांना याचा फायदा मिळणार आहे.

रेल्वे, टपाल, संरक्षण उत्पादन, ईपीएफओ, ईएसआयसी या सारख्या वाणिज्यिक आस्थापनांमधील विनाराजपत्रित १७ लाख कर्मचा-यांना २ हजार ७९१ कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे. तसेच, केंद्र सरकारच्या विना-राजपत्रित १३ लाख कर्मचा-यांना नॉन-प्रॉडक्टिविटी लिंक्ड बोनस मिळेल. त्यांना ९०६ कोटी रुपये बोनससाठी मिळतील. म्हणजे या आठवड्यात ३० लाख कर्मचा-यांच्या हातात ३ हजार ७३७ कोटी रुपये अधिक असतील. परिणामी बाजारात मागणी वाढेल व सणासुदीच्या काळात मध्यवर्गीयांच्या हाती पैसा येईल, असे जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

काही दिवसांपुर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचा-यांना १० हजार रुपये ऍडव्हान्स देण्याची घोषणा केली होती. सर्वच केंद्रीय कर्मचा-यांना ही रक्कम दिली जाणार आहे. कर्मचारी ही रक्कम १० हफ्त्यामध्ये जमा करू शकणार आहेत. मार्च २०२१ पर्यंतच ही योजना लागू असणार असल्याचे सांगण्यात आले होते.

सरकारने नुकसानीच्या मदतीसाठी कृतीवर भर द्यावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या