22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयमोदी सरकारकडून शेतक-यांची चेष्टा

मोदी सरकारकडून शेतक-यांची चेष्टा

एकमत ऑनलाईन

मेरठ : उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ठिकठिकाणी शेतकरी पंचायती घेऊन केंद्रसरकारच्या कृषि कायद्यांविरोधात चौफेर टीका करण्यास प्रारंभ केला आहे. रविवारी मेरठमधील कैली गावात काँग्रेसच्यावतीने शेतकरी पंचायतीचे आयोजन केले होते. त्यात मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना त्यांनी शेतक-यांची चेष्टा सुरु केल्याचा आरोप केला. स्वत:च्या हक्कांसाठी लढणा-या शेतक-यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवले जात असून काँग्रेस हे सहन करणार नाही. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत मी शेतक-यांसाठी लढत राहीन. मग त्यासाठी आणखी १०० वर्षे का लागू देत, असा ठाम विश्वास त्यांनी शेतक-यांना दिला.

प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारच्या शेतकरी विरारेधी धोरणांवर नेमके बोट ठेवले. मोदी सरकारचा नारा केवळ हम दो और हमारे दो, असा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आपल्या केवळ २ मित्रांच्या हितासाठीच मोदींनी हे कृषि कायदे बनवल्याचे सांगत या कायद्यांमुळे शेतक-यांच्या मालाला चांगला दर मिळणार नसल्याची टीकाही त्याुंनी केली. राहुल गांधी यांनी लोकसभेत आंदोलनात शहीद झालेल्या शेतक-यांचा विषय काढला, पण भाजपच्या एकाही खासदाराने या मुद्यावर तोंड उघडले नाही. उलटपक्षी मोदी जेव्हा शेतक-यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवत होते, तेव्हा सर्व टाळया वाजवित होते, असा आरोपही त्यांनी केला. मात्र काँग्रेस शेतक-यांची कर्जदार आहे. त्यामुळे आम्ही कायम शेतक-यांच्या पाठिशी राहू अशी हमी त्यांनी शेतक-यांना दिली.
विमान घेण्यासाठी पैसे मात्र शेतक-यांसाठी नाहीत

पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या परदेश प्रवासासाठी १५ हजार कोटी रुपयांची व्हीआयपी विमाने घेतली. मात्र उत्तरप्रदेशमधील शेतक-यांचे ऊसाचे १६ हजार कोटी रुपयांचे देणे देण्याची दानत नाही. संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी २० हजार कोटी रुपये आहेत. मात्र शेतक-यांना नाहीत, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या लोकहितवादी कामांच्या प्राधान्यक्रमावरही टीका केली.

मेरठमधून क्रांतीला सुरुवात होईल
प्रियांका गांधी यावेळी १८५७ च्या उठावावेळीही मेरठमधूनच क्रांतीला सुरुवात झाली होती, याचा दाखला दिला. सध्याच्या काळातही मोदी सरकारविरोधात क्रांतीची सुरुवात मेरठमधूनच होईल,असा इशाराही त्यांनी दिला.

गोव्यात शिवसेना २०-२५ जागांवर लढणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या