नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. भारतात पहिल्यांदाच आर्थिक मंदी आली असून त्यासाठी पंतप्रधान मोदी यांची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. मोदींनी देशाची शक्तीच कमकुवत केल्याचा प्रहार गांधी यांनी योवळी केला.
रिझर्व बँकेच्या अनुमानानुसार, वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या दुस-या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) आर्थिक विकास दर नकारात्मक राहिलेला आहे. जीडीपी दर दुस-या तिमाहीत -८.६ टक्के इतका घसरला आहे. रिझर्व बँकेच्या या निष्कर्षांवर बोट ठेवत राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले.
गेल्या काही दिवसांपासून खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने मोदींच्या आर्थिक धोरणांमधील त्रुटी जनतेसमोर आणण्याचा सपाटा लावला आहे. नोटबंदी, जीएसटी, कोरोना लॉकडाऊनमुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश यावरुन सातत्याने मोदींवर टीका केली आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार धिमे पडल्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर स्पष्ट दिसत आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये सुस्तावलेला आर्थिक विकास दराला २०२०-२१ च्या वित्तीय वर्षात मोठे नुकसान झाले आहे. विकास दराचे हे सुस्तावलेपण दीर्घकाळ सुरू राहू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सलग दुसºया तिमाहीत वृद्धीदर नकारात्मक असेल असा अंदाज आहे.
डॉक्टरची हलगर्जी; पोटात ठेवली कात्री