30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयमोदी १८-१९ तास काम करत आहेत राजकारण करू नका

मोदी १८-१९ तास काम करत आहेत राजकारण करू नका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: केंद्र सरकार कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारांसोबत आहे. केंद्र कोणताही भेदभाव करत नसल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या निवडणूक दौ-यावरून परतल्यानंतरही दिवसातील १८ ते १९ तास काम करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवरून कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन गोयल यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना संसर्गबाधितांचा आकडा दररोज लाखांच्यापुढे गेला आहे. देशाच्या बहुतांश भागात भयावह चित्र असताना सत्ताधारी पक्ष व विरोधकांमध्ये राजकारण सुरु झाले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्सची कमतरता, कोरोना लसींचा तुडवडा यावरुन केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यापार्श्वभुमीवर गोयल यांनी हे आवाहन केले आहे. एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी ते बोलत होते. पियुष गोयल यांनी ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याच्या दृष्टीतून ग्रीन कॉरिडोअर तयार केला जात असल्याची माहिती दिली.

केंद्र सरकार भेदभाव करत नाही
केंद्र सरकार कोरोनाविरुद्ध लढाई कोणताही भेदभाव न करता लढत आहे. जेव्हा एखादा राजकीय पक्ष आणि काही जण या विषयाला राजकीय रंग देऊ पाहतात ते पाहून फार वाईट वाटते, असेही गोयल म्हणाले. ६ हजार १७७ मेट्रीक टन ऑक्सिजन हा कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणा-या राज्यांमध्ये पुरवला जाणार असून, सर्वाधिक दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्यात येणार आहे, अशी माहिती गोयल यांनी दिली.

कुंभ किंवा रमजानमध्ये नियमांचे पालन अशक्य
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही केंद्रसरकारची बाजू लावून धरली आहे. धार्मिक मेळावे मग कुंभमेळा असो की रमजान यांमध्ये कोरोना नियमांचे पालन केले गेले नाही. ते होऊही शकत नाही. यामुळे त्यांना प्रतिकात्मक कुंभमेळा साजरा करण्याचे आवाहन केले असुन त्यांनी ते पाळलेही आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे. निवडणूक प्रचारसभांची वेळ कमी करण्यात आली आहे. प्रचारसभांतही आम्ही ५ कोटी मास्कचे वाटप केले आहे. मात्र, प्रचारसभांसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार केवळ निवडणूक आयोगालाच आहे, असेही शाह यांनी स्पष्ट केले.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबरोबरच लाचखोरीचा उद्रेक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या