24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयमोदींनी भगवान शंकराप्रमाणे विषप्राशन केले : अमित शाह

मोदींनी भगवान शंकराप्रमाणे विषप्राशन केले : अमित शाह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगल प्रकरणी करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. नुकतीच नरेंद्र मोदींच्या क्लिनचिटला आव्हान देणा-या याचिकेवर सुनावणी पार पडली. यामध्ये त्यांची क्लिनचिट कायम ठेवण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकरणावर अमित शाह यांनी भाष्य केले आहे. तसेच नरेंद्र मोदींवरचे सगळे आरोप फेटाळले आहेत. अमित शाह म्हणाले की, १८-१९ वर्षांची ही लढाई आहे. देशाचा एवढा मोठा नेता एक शब्द न बोलता सगळ्या दु:खांना भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे विषप्राशन केले, त्याप्रमाणे गिळून, सहन करुन लढत राहिला.

आज मोदींचे नेतृत्व सोन्यासारखे झळाळून निघाले. मोदींचे दु:ख मी जवळून पाहिलेय. या आरोपांना सहन करताना पाहिले आहे. आपली बाजू सत्य असतानाही केवळ न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलले नाहीत. असे कोणीतरी खंबीर मनाची व्यक्तीच करू शकते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या