नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल होण्याच्या सुरू असलेल्या अफवांवर आता मौन सोडले आहे. कॅप्टन यांनी याबद्दल आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांनी हे नाकारलेही नाही.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो काही निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल असे कॅप्टन म्हणाले. पीएम सांगतील त्याठिकाणी मी जाईल असेही ते म्हणाले. अमरिंदर म्हणाले, हे पूर्णपणे काल्पनिक आहे. माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. मला याबाबत काहीच माहिती नाही. मी आधीच पंतप्रधानांना सांगितले आहे की त्यांना जिथे हवे असेल त्याठिकाणी नियुक्तीसाठी मी तयार आहे.