26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयराज्यांतील ९ सरकारे पाडण्याचा मोदींच्या नावे नवा विक्रम : के. चंद्रशेखर राव

राज्यांतील ९ सरकारे पाडण्याचा मोदींच्या नावे नवा विक्रम : के. चंद्रशेखर राव

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीने राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन करत शक्ती प्रदर्शन केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. नऊ राज्यातील तुम्ही सरकारे पाडत एक प्रकारे विक्रमच केला आहे, अशी बोचरी टीका के चंद्रशेखर राव यांनी केली. तसेच केंद्र सरकारने आश्वासने पूर्ण न केल्यामुळे प्रश्नचिन्हही उपस्थित केले.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक यावेळी हैदराबादमध्ये होत आहे. हैदराबादच्या नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये या बौठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित १९ राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होत आहे.

तेलंगाणाचे के मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शनिवारी राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे स्वागत केले. दुसरीकडे ते विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी गेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत न करत त्यांनी शासकीय शिष्टाचारचं उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी विरोधीपक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचं कौतक केलं. ते म्हणाले की, दोन्ही उमेदवाराची तुलना करायला हवी. तुमच्या विजयाने देशाची मान उंचावेल. आज देशात अनेक चुकीचे विषय आणि घटना घडत आहेत. परिवर्तनासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे.

पंतप्रधान सरकारे पाडण्यात व्यस्त
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, तुम्ही राज्यातील सरकारे पाडण्यात व्यस्त आहात. आतापर्यंत तुम्ही नऊ सरकारे पाडली आहेत. तुम्ही हा एक विक्रमच केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या