22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयमोदींनी रिकामे हात हलवणे सोडावे

मोदींनी रिकामे हात हलवणे सोडावे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या अटल टनल रोहतांग या बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यानंतर पंतप्रधान मोदी या रिकाम्या बोगद्यात हात उंचावून दाखवतानाचे फोटो समोर आल्याने, सोशल नेटवर्किंग साइटसह राजकीय नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या कृतीवर टिप्पणी करणे सुरू केले आहे. आता तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील यावरून मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणे सोडा, आपले मौन तोडा. प्रश्नांना सामोरे जा, देश तुम्हाला खूप काही विचारत आहे. असे राहुल गांधी यांनी ट्विटद्वार म्हटले आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटसोबत आपल्या भाषणाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मोदींवर विविध मुद्यांवरून टीका करताना दिसत आहेत.

मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडणा-या या बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी आलेले पंतप्रधान मोदी रिकाम्या बोगद्यामध्ये कोणीही नसताना कोणाला हात उंचावून दाखवत होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा प्रश्न उपस्थित करणारे अनेक ट्विट फोटो आणि व्हिडिओंसहीत पोस्ट करण्यात आले आहेत.
मोदी कोणाला बघून हात हलवत होते ?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनीही ट्विटरवरुन मोदींवर रिकाम्या बोगद्यामध्ये केलेल्या या अभिवादनाबद्दल निशाणा साधला आहे. रिकाम्या बोगद्यामध्ये पंतप्रधान कोणाला बघून हात हलवत होते? तिथे जनता उपस्थित नव्हती.

भारत करणार समुद्राखालील क्षेपणास्त्राची चाचणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या