31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयमोदींकडून गरीबांचे अधिकार पायदळी

मोदींकडून गरीबांचे अधिकार पायदळी

राहुल गांधींची टीका ;आधी तुघलकी लॉकडाऊन, आता मजुरांना पैसे काढण्यात अडचणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मनरेगावर काम करणा-या मजुरांना मजुरीचे पैसे काढण्यासाठी होत समस्यांवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.आधी तुघलकी लॉकडाऊन लावून कोट्यवधी मजुरांना रस्त्यावर आणले, नंतर त्यांचा एकमेव आधार असलेल्या मनरेगाची कमाई बँकांमधून काढणेही अवघड करून ठेवले. मोदी सरकार फक्त बोलण्यापुरतच असून, गरीबांचे अधिकार पायदळी तुडवत आहे,’अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.
मनरेगाचे पैसे काढण्यासाठी मोठा खर्च

एका वृत्तसंस्थेने केलेल्या पाहणीनुसार एका मजुराला मनरेगावरील कामापोटीचा मोबदला बँकेतून काढण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले होते. एका मजुराला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यासाठी ६ रुपयांपर्यंत खर्च येतो. त्याचबरोबर बँकेत जाण्यासाठी ३१ रुपये आणि एटीएमपर्यंत जाण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी ६७ रुपये खर्च करावा लागत असल्याचे पाहणीत म्हटले आहे. पाहणीतील या निष्कर्षांवरुन राहुल गांधी यांनी केंद्रसरकारला लक्ष्य केले आहे. मनरेगाच्या मजुरीतील पैसे बँकेतून काढण्यासाठीही मजुरांना या सरकारच्या धोरणामुळे त्रास होत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

मेक इन इंडियानंतरही उत्पादन क्षेत्रात घरघर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या