28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयमोदीजी देशभक्त व राष्ट्रद्रोहींमधला फरक ओळखा

मोदीजी देशभक्त व राष्ट्रद्रोहींमधला फरक ओळखा

एकमत ऑनलाईन

लखनौ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभक्त आणि राष्ट्रदोहीमधला फरक ओळखला नाही. मोदी चीन अमेरिका आणि पाकिस्तानला जाऊ शकतात पण गेल्या दोन महिन्यांपासून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत बसलेल्या शेतक-याला भेटू शकत नाही. यावरुन त्यांनी देशभक्त आणि राष्ट्रदोहीमधला फरक ओळखला नाही हे समजते, असा हल्लाबोल काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केला.

प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील शेतकरी महापंचायतीला संबोधित केले. यावेळी मोदी सरकारवर जोरदार टीकेचे प्रहार केले. जनतेने मोदींना दोन वेळा निवडून दिले. एवढेच नव्हे तर २०१४ पेक्षा २०१९ ला अधिक जागा भाजपला दिल्या. लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा होत्या म्हणूनच दिल्या. भाषणात सब का साथ सब का विकासाच्या गोष्टी मोदी करतात. पण प्रत्यक्षात काम करताना सामान्य लोकांच्या हिताविरोधात त्यांची पावले असतात, अशी त्यांनी टीका केली.

शेतकरी हिताचा विचार नसल्याचा दावा
मोदी शेतक-यांचा हिताचा विचार करीत असल्याचा दावा करतात. मात्र प्रत्यक्षात उलट वागतात, असा आरोप प्रियांका गांधींनी केला. स्वत: साठी १६ हजार कोटींचे विमान तत्परतेने घेतले. मात्र उत्तरप्रदेशमधील शेतक-यांची ऊसबिलाची थकबाकी मोदींनी २०१७ पासून अद्यापही दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. कृषि कायद्यांचा फायदाही शेतक-याला नव्हे तर उद्योगपतींना जास्त असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकारकडून २० लाख कोटींची लूट
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करताना देशातील नागरिक अबकारी कराच्या रुपात मोदी टॅक्स भरत असल्याचा आरोप केला आहे. जर सरकारने अबकारी कर कमी केला तर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६१ रुपये ९२ पैसे तर डिझेलचा दर प्रतिलिटर ४७ रुपये ५१ पैसे इतका होईल असा दावा पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला. मोदी सरकारने इंधनांच्या किंमतीतून देशाचे २० लाख कोटी रुपये लुटले असल्याचा गंभीर आरोप केला.

४ वर्षांत दोन हजारांच्या नोटांचे ३४ कोटी बनावट चलन हस्तगत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या