22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयगरीबांनाच संपविण्याचा मोदींचा उद्देश

गरीबांनाच संपविण्याचा मोदींचा उद्देश

एकमत ऑनलाईन

संगरुर : गरीबीऐवजी गरीबांनाच संपविण्याचा मोदी सरकारचा उद्देश असून, शेतकरी आणि कामगार यांनी उद्ध्वस्त करणे हेच मोदींचे धोरण असल्याची घणाघाती टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी येथे केली आहे.

सध्याच्या घडीला आणण्यात आलेले कृषी कायदे हे शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त करणारे कायदे आहेत. तर जीएसटी आणि नोटाबंदीमुळे लघू आणि मध्यम व्यापा-यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे., अशीही टीका राहुल गांधी यांनी केली. देशातील शेतक-यांचा विरोध असतानाही मोदी सरकारने नवे कृषी कायदे आणले आहेत. हे कायदे आमची सत्ता आल्यास रद्द करु, असे आश्वासन राहुल गांधी यांनी रविवारीच पंजाबमध्ये दिले होते. त्या पाठोपाठ आता आज त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

सरकार कृषी व्यवस्था संपविण्याच्या मार्गात
सध्याचे सरकार हे कळसुत्रीच्या बाहुल्यांप्रमाणे काही मूठभर लोकांच्या तालावर नाचत आहे. पंजाब-हरयाणातील शेतक-यांनी भारताला खाद्य सुरक्षा दिली. आमच्या सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती, पीक खरेदी आणि बाजाराची रचना तयार केली होती. मोदी सरकार ती संपवू पाहत आहे मात्र, काँग्रेस हे होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

गरीबांवर एका पाठोपाठ आक्रमणे
मागील सहा वर्षांमध्ये शेतकरी, गरीब जनता, मजूर वर्ग यांच्यावर मोदी सरकारकडून एकापाठोपाठ एक आक्रमणे केली जात आहेत. गरीब जनतेसाठी ठोस पावले उचलावती ही यांची निती नाही. मोदींना फक्त त्यांच्या तीन ते चार मित्रांचे भले करायचे आहे. पंजाबच्या संगरुर या ठिकाणी झालेल्या रॅलीत त्यांनी हे वक्तव्य केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या