21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयमोदींच्या हत्येची धमकी देणा-यास अटक

मोदींच्या हत्येची धमकी देणा-यास अटक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येची धमकी दिल्याने दिल्लीमध्ये एका २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा तरुण जामीनावर सुटला होता. मात्र पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी त्याने फोन करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येची धमकी दिली. समलान असे या आरोपीचे नाव असून, त्याने पोलिसांना फोन करुन हत्येची धमकी दिली होती.

आरोपीने पोलिसांना फोन करुन मला मोदींची हत्या करायची आहे, असे म्हटले होते़ यानंतर पोलिसांना खजुरी खास परिसरातून त्याला अटक करुन चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. यावेळी त्याने आपल्याला पुन्हा जेलमध्ये जायचे असल्याने धमकी दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी चौकशी केली असताना सलमानविरोधात पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. आरोपीने आपण जेलमध्ये जाण्यासाठी धमकी दिल्याची कबुली दिली असली तरी पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्दा असल्याने गुप्तचर यंत्रणेचे अधिकारीही त्याची चौकशी करणार आहेत.

कृषि प्रक्रिया संचालनालयाची राज्यात लवकरच निर्मिती करणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या