पेरुंदुराई : तामिळनाडूची अर्थव्यवस्था सध्या खूप मोठ्या संकटात आहे. त्यामागे मोदी सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत असल्याचा घणाघाती हल्ला कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान मोदी सध्या तामिळनाडूच्या जनतेला ब्लॅक मेल करत असून आम्ही हे चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.आगामी काळात तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच्या तयारीसाठी इरोड जिल्ह्यातील पेरुंदुराई येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर टीकास्त्र सोडले.
तामिळनाडू हे युपीए सरकारच्या काळापर्यंत मोठे उत्पादन व औद्योगिक केंद्र म्हणून नावारुपाला आले होते. मात्र तामिळनाडूच्या या बलस्थानांवरच मोदी सरकारच्या चुकीचा धोरणांमुळे हल्ला झाल्याची टीका त्यांनी केली. तामिळनाडूचे सरकार त्यांनी पुर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवले आहे व तशाच पद्धतीने जनतेलाही ते आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छितात; मात्र तामिळनाडूची स्वाभिमानी जनता तसे कदापिही होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या तीन दिवसीय दौºयावर असून शेतकरी, विणकरी व सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत, असे कॉंग्रेसच्यावतीने सांगण्यात आले.
काँग्रेसनेच घडवली बोस यांची हत्या – साक्षी महाराजांचा खळबळजनक आरोप