22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयगुजरात दंगलीप्रकरणी खटल्यातून मोदींचे नाव वगळले

गुजरात दंगलीप्रकरणी खटल्यातून मोदींचे नाव वगळले

एकमत ऑनलाईन

साबरकांठा न्यायालयाचा निर्णय : योग्य कारण नसल्याचा निर्वाळा

अहमदाबाद : गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील न्यायालयाने २००२मधील दंगलप्रकरणी दाखल केलेल्या खटल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव काढून टाकले आहे. ब्रिटीश परिवाराने दंगलीत मारल्या गेलेल्या आपल्या ३ नातेवाईकांसाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून हा खटला दाखल केला होता.

नरेंद्र मोदींचे नाव यामध्ये समाविष्ट करण्यास कोणताच तर्क आणि योग्य असे कारण नसल्याचा निर्वाळा वरिष्ठ न्यायाधीश एस. के. गढवी यांनी दिला. फिर्यादींनी आरोपी १ (मोदी) वर विनाकारण आरोप लावले आहेत. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार फिर्यादी विनाकारण खटला चालविण्यासाठी प्रयत्न करत होते. दंगलीच्यावेळी मोदी घटनास्थळी उपस्थित होते याचा कोणताही ठोस पुरावा हाती नाही. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर आरोप लावता येणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

गुजरात दंगलीत २८ फेब्रुवारीला सईद दाउद, शकील दाउद आणि मोहम्मद असवत हे जयपूरवरुन नवसरीला परतत होते. प्रवासादरम्यान झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. नुकसान भरपाईसाठी हा दिवाणी खटला त्यांचे नातेवाईक शिरीन दाऊद, शमीमा दाऊद (दोन्ही ब्रिटीश नागरिक) आणि इम्रान सलीम दाऊद या नातेवाईकांद्वारे २००४मध्ये दाखल केला गेला होता. आरोपींमध्ये नरेंद्र मोदी यांच्याही नावाचा समावेश केला होता. मात्र मोदी हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. ..

बुलेट ट्रेनच्या कामाचा वेग मंदावला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या