24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeराष्ट्रीयजपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी आणि योशिहिदे सुगा यांच्यात द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधील व्यापार आणि कोरोना (Covid-19) विषाणू संसर्ग रोखण्यासंबंधी चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट केले आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि जपान यांच्यातील संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. यामुळे सध्याच्या स्थानिक आणि जागतिक पातळीवरिल आव्हांनांशी लढण्यासाठी मदत होणार आहे. भविष्यातील दोन्ही देशांतील संबंध चांगले राहावेत यासाठी पंतप्रधान सुगा यांना भारताची सहकार्याची भूमिका असेल, नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

चीनच्या राष्ट्रपतींचाही जपानच्या पंतप्रधांनाना फोन; थोडा वेळ संभाषण झाल्याची माहिती
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी देखील जपानच्या नव्या पंतप्रधांनाना फोन केला. मात्र, त्यांच्यामध्ये फारच थोडा वेळ संभाषण झाल्याची माहिती आहे. कोरोना विषाणूचा चीनमधून प्रसार झाल्यानंतर जपान आणि चीनचे संबंध पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजोआबे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान पदी योशिहिदे सुगा यांची निवड झाली आहे.

चीने त्यांचे 5 सैनिक मारले गेल्याची कबुली दिली

पूर्व लडाखमधील(Ladakh) गलवान खोऱ्यात(Galwan Valley) मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये 15 जूनला झटापट झाली होती. त्या घटनेविषयी चीनने कबुली दिली आहे. एका माध्यमाच्या माहितीनुसार भारतासोबत झालेल्या बैठकीत चीने त्यांचे 5 सैनिक मारले गेल्याची कबुली दिली. यामध्ये एका कमांडिग ऑफिसरचा समावेश होता. यापूर्वी चीने फक्त एक सैनिक मारला गेल्याची कबुली दिली होती. दरम्यान, गलवानमधील झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीने 5 सैनिक मारले गेल्याची कबुली दिली असली तरी अमेरिकी आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार चीनचे 40 सैनिक मारले गेले होते.

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या