24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयमोदींचा कारभार भंगारापेक्षा बरा- राहुल गांधी

मोदींचा कारभार भंगारापेक्षा बरा- राहुल गांधी

- अंमलबजावणीबाबतही मूडीजने व्यक्त केली शंका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
कोरोना आणि टाळेबंदीमुळे देशाचा अर्थप्रवास बिकट ठरणार आहे. अमेरिकी मूडीजने भारताचे पतमानांकन खाली खेचतानाच देशाला कमी विकास दर व सरकारला वाढत्या वित्तीय तुटीचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला आहे. देशाच्या गुंतवणूकविषयक आवश्यक अशा वातावरणासाठीचे सार्वभौम पतमानांकन मूडीजच्या गुंतवणूक सेवा विभागाने सध्याच्या बीएए२ वरून बीएए३ असे कमी केले आहे. कोरोना संकटाचे आव्हान पेलण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनांच्या निर्धोक अंमलबजावणीबाबतही मूडीजने शंका उपस्थित केली आहे. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार भंगारापेक्षा जरा बरा, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.

मोदींचा कारभार भंगारापेक्षा जरा वरच्या दर्जाचा असल्याचे मूडीजचे रेटिंग आहे, अशी उपहासात्मक टीका राहुल गांधींनी केली आहे. गरीब आणि एमएसएमई क्षेत्राला मदतीच्या अभावाचा अर्थ असा आहे की पुढे स्थिती आणखी खराब होणार आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मूडीजने यापूर्वी, नोव्हेंबर २०१७ मध्ये भारताचे पतमानांकन बीएए३ वरून बीएए२ असे उंचावले होते.

Read More  पार्टीत होते 9 कोरोना पॉझिटिव्ह : वाढदिवस साजरा करणाऱ्या दोघांवर गुन्हा

तब्बल १३ वर्षांच्या कालावधीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत सुधारणा झाल्याचे मत याद्वारे मांडण्यात आले होते. भारताचा चालू वित्त वर्षांचा विकास दर शून्याखाली राहण्याचा अंदाज अनेक वित्तसंस्था, दलालीपेढयÞा तसेच पतमानांकन संस्थांनी व्यक्त केला आहे. गेल्या वित्त वर्षांत भारताची अर्थप्रगती गेल्या ११ वर्षांच्या सुमार स्थितीतील राहिल्याचे गेल्याच आठवड्यातील आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. आघाडीच्या वित्तसंस्थांमार्फत दिले जाणाºया गुंतवणूकविषयक पतमानांकनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व आहे. या गुंतवणूक दर्जानुसार देशात किती व कोणत्या क्षेत्रात विदेशी चलन, प्रकल्पांच्या माध्यमातून गुंतवणूक करायची याबाबतची धोरणे राबविली जात असतात. मूडीजने देशाच्या सार्वभौम पतमानांकनाबरोबरच देशाच्या विदेशी तसे स्थानिक चलनाबाबतचे पतमानांकनही कमी केले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने काही दिवसांपूर्वी नोंदविलेल्या तळाची पार्श्वभूमी त्यामागे असल्याचे मानले जाते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या