25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयभाजप कार्यालयात पोलिस वाहनांतून पुरविल्या जातोय पैसा

भाजप कार्यालयात पोलिस वाहनांतून पुरविल्या जातोय पैसा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. निमलष्करी दल आणि पोलिसांच्या ट्रकमध्ये भरुन दोन नंबरचा पैसा हा भाजपा कार्यालयात पोहचवला जातो, असा गंभीर आरोप गेहलोत यांनी केला आहे. जयपूरमध्ये पार पडलेल्या काँग्रेसने आयोजित केलेल्या स्वातंर्त्यदिनाच्या कार्यक्रमात अशोक गेहलोत यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

गोवा, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांतील सरकारे ही कांदा बटाट्यांनी पडलेली नाहीत असे म्हणत अशोक गेहलोत यांनी टीकास्त्र सोडले आहे. नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. ज्या ५००-१०००च्या नोटा जास्त जागा घेत होत्या, त्यात यांनी बंद केल्या, हा कॉमन सेन्सचा भाग आहे. यांनी १००० रुपयांची नोट बंद करुन २००० रुपयांच्या नोटा का सुरू केल्या. रुपयांची जी वाहतूक करण्यात येते, त्यात २००० रुपयांच्या नोटा कमी जागा घेतात, त्यामुळेच हे करण्यात आले असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.

हे काय करतात तुम्हाला माहीत आहे का? ज्या राज्यात भाजपाची सरकारे आहेत, हे तिथे निमलष्करी दल किंवा पोलिसांना पकडतात. त्या निमलष्करी दलांच्या ट्रकमधून पैसा आणला जातो. हा ट्रक भाजपाच्या कार्यालयाच्या मागे नेला जातो. गाडी पोलिस किंवा निमलष्करी लाची असेल तर त्या गाडीला पकडणार कोण, लोकांना वाटते त्यांचे पोलिस दल आले आहे, त्यांना मदत करण्यासाठी. हे देशात सुरू असलेले मोठे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोपही अशोक गेहलोत यांनी केला आहे.
——————-

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या