22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयबँक खात्यातून चोरी झालेली रक्कम परत मिळणार!

बँक खात्यातून चोरी झालेली रक्कम परत मिळणार!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात सायबर क्राइमचे प्रमाण वाढले असून, याव्दारे अनेकांना गंडवल्याच्या घटना दररोज कानावर पडत असतात़ अशावेळी ऑनलाईन खात्यातून पैसे चोरी झाल्यास ते पैसे परत मिळविण्यसाठी मोठी मशागत करावी लागते़ आता मात्रा सरकारने यावर तोडगा काढत सायबर आर्थिक गुन्ह्यासाठी मोठी तगडी तज्ज्ञांची टीमच तयार केली असून, तपासअंती आपले पैसे सुध्दा परत मिळवून देणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

एटीएम किंवा डेबिट कार्ड आपल्या खिशात ठेवलेले असते. मात्र, आपल्या बँक खात्यातून पैसे काढले जातात. एवढेच नाही तर सायबर गुन्हेगार (सायबर फ्रॉड) दुसºयाच्या हातात गेलेल्या आपल्या क्रेडिट कार्डवरून खरेदी करतात. मात्र, ही फसवणूक ज्यावेळी आपल्या मोबाइलवर या ट्रान्जक्शनचा मेसेज येतो. त्यावेळी कळते. परंतु आता अशा प्रकारच्या सायबर आर्थिक फसवणुकीत गेलेली रक्कम परत मिळण्यासाठी सरकारने तज्ज्ञांची टीम तयार केली आहे. या टीमला सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हटले जाणार आहे. टीमच्या मदतीसाठी देशात लॅबोरटरी तयार करण्याचे कामही सुरू आहे.

संसदीय समितीसमोर गृह मंत्रालयाच्या अधिकाºयांनी सांगितले की, आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम तयार करण्यात आली आहे. टीममध्ये १२६१५ लोक आहेत. यामध्ये पोलिस, सरकारी वकील आणि न्यायालयीन सेवेशी संबंधित लोकांचा समावेश आहे. हे सर्व देशाच्या विविध भागातील आहेत. हे खासकरून सायबर आर्थिक फसवणुकीतील पीडिताला मदत करतील. तसेच, महिला आणि मुलांवर होणाºया सायबर क्राइममध्ये सुद्धा पीडिताला मदत करतील.

तक्रार करण्यासाठी पोर्टल तयार
संसदीय समितीसमोर गृह मंत्रालयाच्या अधिका-यांनीही सांगितले की, आता सायबर आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीला तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही. पीडित व्यक्ती घरी बसून सायबर क्राइम नावाच्या पोर्टलवर तक्रार देऊ शकते. एकदा तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित तपास अधिकारी पीडितेशी स्वत: संपर्क साधतील.

महिला आणि मुलांवरील तक्रारीदेखील करता येणार
महिला व मुलांवरील सायबर क्राईमच्या तक्रारीही या पोर्टलवर करता येतील आणि अशा विशेष प्रकरणात तक्रारदाराची ओळख देखील गोपनीय ठेवली जाईल.

एसटी यंदा दिवाळीत भाडेवाढ करणार नाही !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या